कृषी विभाग, पंचायत समिती देसाईगंज मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना
अ.क्र | योजना | घटकनिहाय उच्चतम अनुदान मर्यादा | लाभार्थी पात्रतेचे निकष | अर्ज करण्याची कार्यपदधती |
---|---|---|---|---|
1 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना | नविन सिंचन विहिर – रू. 4,00,000/- जुनि विहीर दुरूस्ती – रू. 1,00,000/-, शेततळे प्लॉस्टीक अस्तरीकरण – रू. 2,00,000/-,विज जोडणी आकार- रू. 20,000/-, पंपसंच (डिझेल/विदयुत)– रू. 40,000/-, इनवेल बोअरींग – रू. 40,000/-, तुषारसंच – रू. 47,000/-,ठिबक सिंचन संच – रू. 97,000/-, परसबाग- रू. 5000/-, पीव्हीसी/एचडीपीई पाईप- रू. 50,000/-, यंत्रसामुग्री (बैलचलीत/ ट्रॅक्टर चलीत अवजारे) – रू. 50,000/-, सोलार पंप (विज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी)- रू.50,000/- | 1. लाभार्थी अनुसूचित जाती/ नवबोध्द प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक राहील. 2. अनुसूचीत जातीच्या शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेला जात प्रमाणपत्र आवश्यक राहील. 3. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक राहील. (नगरपंचायत, नगरपरिषद व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील) 4. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे. | या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेत स्थळावर अर्ज करावे. |
2 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील/क्षेत्रांतर्गत) | नविन सिंचन विहिर – रू. 4,00,000/- जुनि विहीर दुरूस्ती – रू. 1,00,000/-, शेततळे प्लॉस्टीक अस्तरीकरण – रू. 2,00,000/-,विज जोडणी आकार- रू. 20,000/-, पंपसंच (डिझेल/विदयुत)– रू. 40,000/-, इनवेल बोअरींग – रू. 40,000/-, तुषारसंच – रू. 47,000/-,ठिबक सिंचन संच – रू. 97,000/-, परसबाग- रू. 5000/-, पीव्हीसी/एचडीपीई पाईप- रू. 50,000/-, यंत्रसामुग्री (बैलचलीत/ ट्रॅक्टर चलीत अवजारे) – रू. 50,000/-, सोलार पंप (विज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी)- रू.50,000/-,विंधन विहीर- रू. 50,000/- | 1. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक राहील. 2. अनुसूचीत जमातीच्या शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेला जात प्रमाणपत्र आवश्यक राहील. 3. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक राहील. (नगरपंचायत, नगरपरिषद व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील) 4. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे. | या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेत स्थळावर अर्ज करावे. |
3 | नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम (NNBOMP) | बायोगॅस संयंत्र 2 ते 4 घ. मी. साठी अनुदान 1. अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकरीसाठी अनुदान रू. 22,000/- आहे. 2 इतर प्रवर्गातील शेतकरीसाठी अनुदान रू. 14,350/- आहे. | 1. अनुसूचीत जाती / अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतक-यांकडे सक्षम प्राधीका-याने दिलेला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. इतर प्रवर्गातील शेतक-यांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. 2. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे. 3. शेतक-याकडे किमान 2-3 दुधाळू जनावरे असणे आवश्यक आहे 4. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे. | अर्ज विहीत नमुण्यात आवश्यक कागदपत्रासह पंचायत समिती कार्यालयात दाखल करावा. |
4 | जिल्हा निधी योजना | 1. शेतक-यांना 50 टक्के अनुदानावर तृणधान्य/ कडधान्य/ गळीतधान्य बियाणे पुरवठा करणे. 2. शेतक-यांना पिकसंरक्षणासाठी 50 टक्के अनुदानावर किटकनाशके पुरवठा करणे. 3. शेतक-यांना ताडपत्री/ तारेची जाळी खरेदीवर 75 टक्के अनुदान देणे (डीबीटी योजना) 4. परसबागेकरीता शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर भाजीपाला मिनिकीट पुरवठा करणे 5. शेतक-यांसाठी कृषी विषयक प्रचार प्रसिध्दी, प्रदर्शने व कृषी मेळाव्याचे आयोजन करणे | 1. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे. 2. शेतकरी अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती किंवा अल्प / अत्यल्प भुधारक असावा. 3. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे. | अर्ज विहीत नमुण्यात आवश्यक कागदपत्रासह पंचायत समिती कार्यालयात दाखल करावा. |
5 | पंचायत समिती सेसफंड योजना | शेतक-यांसाठी कृषी विषयक प्रचार प्रसिध्दी, प्रदर्शने व कृषी मेळाव्याचे आयोजन करणे | ||
6 | कृषी निविष्ठा गुणनियंत्रण | 1. शेतक-यांना उच्च दर्जाचे बि-बियाणे, किटकनाशके व खतांचा पुरवठा सुरळीत रहावा याकरीता नियमित कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करणे, संशयीत कृषि निविष्ठांचे नमूने काढुन प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठविणे 2. कृषी निविष्ठांचे दर नियंत्रीत ठेवणे, काळाबाजार होवू न देणे. 3. अप्रमाणित निविष्ठांबाबत कायदेशीर कारवाई करणे. 4. पिक तक्रार निवारण समितीद्वारे तक्रारींचे निवारण करणे |