पंचायत विभागाचा थोडक्यात परिचय
पंचायत समिती अंतर्गत पंचायत विभागाचा कामकाज चालत असतो. या विभागाचा विभाग प्रमुख विस्तार अधिकारी (पंचायत) असतो. ग्रामपंचायत मधील विकास कामांचे मुल्यमापन व सनियंत्रण या विभागाअंतर्गत करण्यात येत असतो. गावस्तरावर वेगवेगळया योजनांची अंमलबजावणी योग्य व चांगल्या प्रकारे होण्यासाठी या विभागाअंतर्गत संबंधीतांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत असतो.
पंचायत विभाग अंतर्गत चालणाऱ्या योजनांची माहिती
1.दलित वस्ती सुधार योजना
2.डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना
3.१५ वा वित्त आयोग
4.समाजकल्याण अंतर्गत येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी
5.५ टक्के थेट निधी योजना
6.स्वच्छ भारत अभियान
7.जल जीवन मिशन
8.आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत चालणारे कामे
9. ई ग्राम स्वराज
पंचायत विभागा अंतर्गत चालणारे कक्ष
1.ग्रामपंचायत अधिकारी यांची आस्थापना
2.गट संसाधन केंद्र कक्ष
3.तालूका पेसा कक्ष
4.तालूका प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (राग्रास्वअ)
5.आपले सरकार सेवा केंद्र कक्ष
पंचायत विभागाच्या कक्षाअंतर्गत चालणारे कामे
1. गट संसाधन केंद्र (पावस्व)
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटूबांना वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून 12,000 रुपयाचे अनुदान दिले जाते.
- https://sbm.gov.in या लिंक द्वारे आवश्यक कुटुंबाना शौचालय बांधकामाकरिता अर्ज करण्याची सुविधा पुरविण्यात येते.
- सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करुन गावे हागनदारी मुक्त अधीक म्हणून घोषीत करणे
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा आयोजित करून नागरिकांना स्वच्छतेबद्दल जागृत करून ग्रामपंचायातीना पुरस्कार देऊन सन्मानित करणे.
- ग्राम पंचायत अंतर्गत जि प शाळा, निम शासकीय शाळा, महाविद्यालय विध्यार्थ्यांना करिता स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन संबंधीत विषयावर निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, आयोजित करणे.
- जागतिक शौचालय दिन, जागतिक हाथधुवा दिन, स्वच्छता ही सेवा या सारखे दिन विशेष उपक्रम गावामध्ये साजरे करणे.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावामध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी 2,10,000 रु चे अनुदान देण्यात येते.
- जल जिवन मिशन अंतर्गत नळ नसलेल्या लाभार्थ्यांना नळ योजना देऊन हर घर जल या संकल्पनेतून त्यांना पिण्याचे पाण्याची सुविधा दिली जाते.
- इतर माहीतीसाठी या कार्यालयासोबत संपर्क करावा.
2.तालूका पेसा कक्ष
- अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5 टक्के थेट निधी योजनेअंतर्गत आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येते
- अनुसूचित क्षेत्रामध्ये (पेसा) तालूक्यातील कुरुड, कसारी तू, शीवराजपूर, डोंगरगांव, विहीरगांव, पिंपळगांव, पोटगांव, कोरेगांव, शंकरपुर या ग्रामपंचायतींचा समावेश होतो.
- पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेला विषेश अधिकार प्रदान करण्यात आले आहे.
- गौणवनोत्पादन, मत्स्यतलावांचे व्यवस्थापन, बाजाराचे व्यवस्थापन इत्यादी कामे ग्रामपंचायत ग्रामसभेच्या माध्यमातून करु शकतात.
- इतर माहीतीसाठी या कार्यालयासोबत संपर्क करावा.
3.तालूका प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (राग्रास्वअ)
- सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकार, बचत गटातील महिला, विस्तार अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांना प्रशीक्षण देऊन प्रशिक्षित करणे.
- वर्चुअल प्रशिक्षणाचे आयोजन करणे
- इतर माहीतीसाठी या कार्यालयासोबत संपर्क करावा.
आपले सरकार सेवा केंद्र कक्ष
- १५ वा वित्त आयोग
- ई ग्राम स्वराज पोर्टलद्वारे (लेखे अद्यावत करणे व कामाचे देयके वितरण करणे) कामकाज करणे.
- rdd.mahaonline.gov.in या प्रणालीद्वारे नागरिकांनी अर्ज केलेल्या प्रमाणपत्राचा स्वीकार करून निराकरण करणे
- CRS पोर्टलद्वारे जन्म व मृत्यु नोंदणी करून घेणे
- servicesonline.gov.in या पोर्टलद्वारे १९ प्रकारचे दाखले नागरिकांना देणे
- mahaegram.co.in या पोर्टलद्वारे ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने अद्यावत करणे.
- इतर माहीतीसाठी या कार्यालयासोबत संपर्क करावा.