पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

सामान्य प्रशासन विभाग

1. परिचय :-

सामान्य प्रशासन विभाग, पंचायत समिती हा एक महत्त्वाचा विभाग आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी जबाबदार असतो. पंचायत समिती हे एक स्थानीय शासकीय संस्थान आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि 243A मध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार काम करते.

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समितीमध्ये एक महत्वाचा विभाग आहे. गट विकास अधिकारी हे या विभागाचे प्रमुख असतात. गट विकास अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या पंचायत समिती कार्यालय व अंतर्गत्‍ कार्यालयांतील सर्व प्रशासकीय प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन सादर करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते.


तालुक्यांतर्गत असणारे गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम / सिंचाई / ग्रा. पा. पु. उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक शाळा, अंगणवाडया यांचेमार्फतीने राबविणेत येणाऱ्या शासनाच्या वेगवेगळ्या विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व यशस्वीपणे झाली आहे किंवा नाही. त्याचप्रमाणे प्रशासकीय कामांचा आढावा, याची पाहणी करणे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो. या विभागामार्फत समता दिन, दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन, क्रांती दिन, सद्भावना दिवस, संकल्प दिन, एकता सप्ताह, हुतात्मा दिन या बरोबर प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिन, कामगार दिन तसचे शासनाद्वारे निर्देशीत केलेले कार्यालयांत साजरे करावयांचे जयंती / राष्ट्रीय दिन इ. कार्यक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यावर नियंत्रण व परिरक्षण केले जाते.

 
पंचायत राज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती, वि. जा. भ. ज. कल्याण समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती, महिला हक्क व बालकल्याण समित्या भेट देतात. समित्यांचे भेटी कार्यक्रमावेळी माहितीचे एकत्रीकरण व सादरीकरण या विभागामार्फतीने केले जाते.

 
जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत असलेल्या विविध योजना व विकास कामांचा आढावा व मार्गदर्शन करणेसाठी तालुक्यांतील उप अभियंता , गट शिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची मासिक बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे नियोजन विभागामार्फत केले जाते. तसेच गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांची विभागीय स्तर व राज्य स्तरावरील बैठकीसाठ लागणाऱ्या आवश्यक माहितीचे एकत्रीकरण या विभागामार्फतीने करणेत येते. मा. लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी ज्या वेळी तालुक्याच्या भेटीकरिता येत असतात, त्यावेळी विकास कामे व आस्थापना विषयक बाबी संदर्भात माहिती या विभागामार्फत दिली जाते. राजीव गांधी प्रसासकीय गतीमानता(प्रगती) अभियान दरवर्षी 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत राबविली जाते. अभियानांतर्गत कार्यालय सुशोभिकरण, अभिलेख वर्गीकरण, कार्यायीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता कार्यपध्दती सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स, खर्चात काटकसर, प्रशासन लोकाभिमुख करणे, कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे इत्यादी बाबी अभियांनांतर्गत राबविणेत येतात. सामान्य प्रशासन विभागामार्फत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन या कार्यालयांमार्फत करण्यांत येते.

2. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्याचे मुख्य उद्दिष्टे :-

  • स्थानिक स्वराज्य संस्थांचे व्यवस्थापन: पंचायत समितीच्या कार्यप्रणालीचा सामान्य प्रशासन विभाग देखरेख करतो. सामान्य प्रशासन विभागांचे अंतर्गत येणारे सांख्यीकी विभाग तालुक्यांचे प्रशासन, त्यांचे बजेट, योजनांची अंमलबजावणी इत्यादी समाविष्ट आहे. पंचायत समिती, सभेचे आयोजन करणे व तालुक्यांकरीता विकासात्मक कामांसबधाने नियोजन करणे.
  • नियम आणि धोरणे: सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडुन वेळावेळी विविध नियम आणि धोरणे तयार त्या धोरणानुसार व नियामानुसार प्रत्यक्षांत अंमलबजावणी करणे. महाराष्ट्र शासनाकडुन विविध योजना तसेच जिल्हा परिषद कडुन ज्या विकासात्मक व वैयक्तीक लाभाच्या योजना तयार करताता त्या सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी करते. सामान्य प्रशासन विभाग व पंचायत समिती कार्यालय व अंतर्गत कार्यालयांवर देखरेख करतो.
  • प्रशासनिक सहाय्य: विविध सरकारी योजनेची माहिती, पगार, सेवा नियम, प्रशिक्षण इत्यादी बाबींचे व्यवस्थापन करणे.
  • प्रशासनिक सुधारणा: पंचायत समितीमध्ये प्रशासनिक सुधारणा व कार्यक्षमतेसाठी विविध पावले उचलली जातात.

3. सामान्य प्रशासन विभागाचे कार्य:-

  • पंचायत समिती मासिक सभा सर्वसाधारण सभा/ विशेष सभा यांचे कामकाज पाहणे.
  • गट क व गट ड मधील अधिकाऱ्यांच्या आस्थापनेचे संपुर्ण कामकाज.
  • पंचायत समिती हे एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जबाबदार असते. त्यामधील सामान्य प्रशासन विभाग ही एक महत्वाची भुमीका बजावते.
  • पंचायत समिती कार्यालय व अंतर्गत कार्यालयांत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयकबाबी सभांळतात, तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते तसेच सेवा निवृत्त / कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांचे आर्थीक लाभ वेळीच काढण्यात येतात.
  • पंचायत समिती कार्यालयांत प्राप्त होणारे टपाल यांची वेळीच दखल घेऊन वेळीच प्राप्त टपालावर कार्यवाही करण्यांत येते.
  • पंचायत समिती अंतर्गत मासिक सभा महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनिमय 1961 चे नियम 119 अन्वये पार पाडण्यांत येते.
  • अधिकारी / कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी.
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन विषयक लाभ प्रदान करणे.
  • कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढणे.
  • पेन्शन अदालतीचे आयोजन करणे.
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत इतर विभागांशी समन्वय साधणे.
  • पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रदान करणेस प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांस सादर करणे.
  • न्यायालयीन प्रकरणे तसेच विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे.
  • माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज निकाली काढणे.
  • RTS अंतर्गत सेवा पुरविणे.
  • मा. लोकायुक्त / उप लोकायुक्त प्रकरणे निकाली काढणे, मुख्य मंत्री सचिवालय तक्रारी निकाली काढणे.
  • लोकशाही दिन तक्रारी निकाली काढणे.
  • विधानसभा तारांकित / अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
error: Content is protected !!
Scroll to Top