पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

बांधकाम विभाग पंचायत ‍समिती देसाईगंज

बांधकाम विभाग पंचायत समिती हा महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचा पंचायत समिती मधील एक महत्त्वाचा विभाग आहे. पंचायत समितींच्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या बांधकाम कामांचा समावेश असतो, ज्यात ग्रामीण भागातील विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे, सार्वजनिक इमारती, रस्ते, नाली, पूल, शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक सुविधांचे बांधकाम तथा दुरुस्तीकरण करणे यांचा समावेश होतो.

बांधकाम विभागाचे प्रमुख कार्य:

1.सार्वजनिक इमारती आणि संरचना: पंचायत समिती स्थानिक प्रशासनाच्या अंतर्गत सार्वजनिक इमारती आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे नियोजन, बांधकाम आणि देखभाल करण्याचे काम करते. यामध्ये शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालये, सभामंडप ,शोकसभामंडप , सार्वजनिक स्वच्छतागृह, वाचनालये, अंगणवाडी व इतर यासारख्या इमारतींचे बांधकाम समाविष्ट आहे.

2.रस्ते आणि पुलांचे काम:

    • ग्रामीण रस्त्यांची आणि पुलांची देखभाल आणि बांधकाम हे महत्त्वाचे कार्य असते. यामध्ये अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, खड्ड्यांचे काम, पुलांचे बांधकाम, मोरी बांधकाम इत्यादी यांचा समावेश होतो.
  • ग्रामीण भागातील रस्त्यांचे बांधकाम, रुंदीकरण, सुधारणांसाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती जबाबदार असते.

3.स्वच्छता व नाली बांधकाम : नाली (गटारे)बांधकाम , सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता योजना यासारख्या कामांवर देखील या विभागाचे लक्ष असते. (उदा. सार्वजनिक शौचालये , घनकचरा वर्गीकरण शेड , शौचखड्डे इत्यादी.)

4.ग्रामीण विकास योजना : विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायत स्थरावरील योजनांच्या अंमलबजावणीसाठीही बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका पार करत आहे.

5.निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण – संबंधित अधिकारी/अभियंता बांधकामाची गुणवत्ता, कालावधी, आणि बांधकाम साहित्य ( सीमेंट,लोहा,वीटा, इत्यादी) यांच्या गुणवत्तेचे निरीक्षण करिता साहित्य चाचणी अहवाल मागवतात . कामाची प्रगती नियमितपणे तपासली जाते आणि आवश्यकता पडल्यास सुधारणा सुचवली जातात

6.पंचायत समिती स्थानिक पातळीवर योजनांचे व्यवस्थापन करते आणि बांधकाम विभाग त्या योजनांच्या कार्यान्वयनासाठी मार्गदर्शन व सहाय्य प्रदान करतो. बांधकाम कामांची गुणवत्ता, कालावधी आणि प्रत्यक्ष कामाची देखरेख करणे हे देखील या विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे.

7.पंचायत समिती व ग्रामपंचायत स्थानिक गरजा आणि प्राथमिकतेनुसार विविध कामाची निवड करते. त्यानंतर त्या कामाचे योजणाचे अंदाजपत्रक तयार करून , तांत्रिक मान्यता करीता ५ लक्ष खालील अंदाजपत्रके उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांच्या कडे व ५ लक्ष वरील अंदाजपत्रके कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कडे पाठविल्या जातात. त्या नंतर या योजना संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात.

8.ग्रामपंचायत व पंचायत समिती विविध कंत्राटदारांना काम देऊन त्या प्रकल्पांची अंमलबजावणी करत असते. सदर कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेची, कालावधीची पाहणी बांधकाम विभागाच्या मार्फत केली जाते. व प्रत्यक्ष झालेल्या कामाचे मूल्यांकन कनिष्ट अभियंता / शाखा अभियंता यांच्या कडून केले जाते .

संबंधित अधिकारी:

बांधकाम विभागाअंतर्गत विविध अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश असतो, जसे की:

  • कार्यकारी अभियंता
  • उपविभागीय अभियंता
  • शाखा अभियंता / कनिष्ट अभियंता
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • आरेकख
  • कंत्राटदार

बांधकाम विभाग पंचायत समिती देसाईगंज येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयी माहिती

  • श्री. नवीन एस सोरते ( कनिष्ट अभियंता )
  • श्री. हेमंत एस कोपुलवार ( कनिष्ट अभियंता )
  • श्री. प्रवेश एस त्रिपाटी ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
  • श्रीमती. प्रेमलता बोडेले ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
  • श्रीमती. प्राची उके ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
error: Content is protected !!
Scroll to Top