पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

आरोग्य विभाग पंचायत ‍समिती देसाईगंज

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंत वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात. आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा लाभ घेणे आणि आरोग्य सुविधांचा विकास करणे, आरोग्य सेवांच्या क्षेत्रात समन्वय साधण्यासाठी आरोग्य सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि विभागांमध्ये समन्वय साधणे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी कार्य करते. शासनाच्या आरोग्य धोरणांच्या अमलबजावणीसाठी कार्य करणे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आणि कार्यालयाची कार्य आणि जबाबदारी खालीलप्रमाणे आहेत:

उद्देश :-

– ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा लाभ घेणे आणि आरोग्य सुविधांचा विकास करणे.

– आरोग्य सेवांच्या वितरणात सुधारणा करणे आणि आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सहजतेने उपलब्ध करून देणे.

– आरोग्य सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि विभागांमध्ये समन्वय साधणे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कार्य आणि जबाबदारी जबाबदारी खालीलप्रमाणे आहेत:

१)आरोग्य सेवांचे नियोजन आणि आयोजन

२)आरोग्य सेवांचा लाभ

३)आरोग्य सेवांच्या क्षेत्रात समन्वय

४)आरोग्य सेवांच्या क्षेत्रात निरीक्षण आणि मूल्यांकन

५)आरोग्य सेवांच्या क्षेत्रात प्रशिक्षण आणि विकास

६)आरोग्य सेवांच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास

७)राष्ट्रीय आरोग्य अभियान: ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी कार्य करते.

९)आशा स्वयंसेविका: ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी कार्य करते.

तालुका आरोग्य विभाग कार्यालयीन रचना

तालुका आरोग्य विभाग कार्यालयीन रचना

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वडसा अंतर्गत आरोग्य संस्था

 १)प्राथमिक आरोग्य केंद्र :- ०३ कोरेगाव कुरुड सावंगी

२)प्राथमिक आरोग्य उपकेंद्र:- १५चोप, बोळधा, शंकरपुर, डोंगरगांव, पोटगाँव, विहीरगाँव, किन्हाळा, कोकड़ी, कोंढाळा, तुळशी, कुरुड, शिवराजपुर, विसोरा, आमगांव, सावंगी                       

 ३)प्राथमिक आरोग्य पथक:- ०१ विहिरगाव

तालुक्यात आरोग्य विभाग अंतर्गत विविध योजनाची माहिती

अ.क्र.

योजनेचे नांव

उद्देश

आवश्यक कागदपत्रे

1

जननी सुरक्षा योजना

केंद्र शासनामार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी आणि महानगरपालिका भागात जननी सुरक्षा योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शासकिय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास देय आहे.

ग्रामीण भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.७००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. . शहरी भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात, शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.६००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसूती घरी झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.५००/- याप्रमाणे लाभ देय राहिल.

2

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांना तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत गरोदर तथा ४२ दिवसा पर्यंतच्या स्तनदा माता व एक वर्षापर्यतच्या आजारी बालकास लागणाऱ्या औषधे व साधनसामग्रीचा पुरवठा JSSK EDL प्रमाणे राज्य स्तरावरून करण्यात येईल.

शासकीय आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गरोदर माता व ४२ दिवसा पर्यंतच्या स्तन मातांना तसेच वर्षापर्यंतच्या आजारी बालकास लागणारी सर्व औषधे व साधनसाम मोफत मिळेल याची दक्षता घ्यावी.

3

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात यावे. जिल्हा स्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा है या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. हे अभियान कार्यक्षेत्रातील शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात यावे.

error: Content is protected !!
Scroll to Top