लेखा विभाग, पंचायत समिती देसाईगंज
1. परिचय :-
पंचायत समिती कार्यालयामधिल लेखा विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्तीय व लेखा कार्यप्रणालीसाठी जबाबदार असतो.
पंचायत समिती स्तरावर लेखा विभागामध्ये सहायक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा व कनिष्ठ सहायक लेखा असुन ही पदे मंजुर असुन यांचे कडून लेखा विषयक कामे पार पाडण्यात येतात. प्रशासकिय प्रमुख गट विकास अधिकारी पंचायत समिती हे असतात.
पंचायत समिती कार्यालया अंतर्गत विभागांना व कार्यालयांना जिल्हा स्तरावरिल त्यांचे संबधित विभाग प्रमुखाकडून काढण्यात आलेल्या जिल्हा निधी, ग्रामिण पाणी पुरवठा (देखभाल व दुरुस्ती), हस्तांतरण व अभिकरण योजनेमधिल तरतुद वितरण आदेशानुसार विविध लेखाशिर्षा अतंर्गत वेतन व भत्ते, विकास योजना बांधकामे व दुरुस्ती करीता पंचायत समिती कार्यालयाकडे जिल्हा परिषद वित्त विभागाकडुन वित्तप्रेषणाव्दारे तरतुदी उपलब्ध होतात. प्राप्त तरतुदीचे अनुषंगाने विविध लेखाशिर्षांतर्गत पंचायत समिती अंतर्गत विभाग व पंचायत समिती स्तरावरील गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम / सिंचाई / ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने यांचेमार्फतीने राबविणेत येणाऱ्या शासनाच्या वेगवेगळ्या विकास योजनांची, वेतन व भत्यांची देयके तयार करुन पंचायत समिती स्तरावर लेखा विभागात मंजुरी साठी सादर करण्यात येतात.
पंचायत समिती अंतर्गत विविध विभाग व कार्यालयाकडून प्राप्त होणारी देयके महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखासंहिता 1968, मुंबई वित्तीय नियम 1959 व शासनाचे वेळोवेळी प्राप्त शासन निर्णय, परिपत्रके यामधिल नियमानुसार अंमलबजावणी करुन सादर करण्यात आलेली आहेत याबाबत प्राप्त देयकांचे पुर्व लेखा परिक्षण लेखा विभागामार्फत करण्यात येते व तदनंतर पंचायत समिती कार्यालयाचे वित्तीय व प्रशासकिय प्रमुख गट विकास अधिकारी यांचेकडे मंजुरी करिता सादर करण्यात येतात. देयके मंजुरी अंती देयकाची रक्कम सबंधितांचे बँक खात्यावर अदा करण्यात येते.
2. पंचायत समिती सेसफंड अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत.-
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 137 (2) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम 1966 मधिल तरतुदीनुसार प्रत्येक वर्षी पंचायत समितीस लेखाशिर्ष 3604-स्थानिक स्वराज्य संस्था यांना नुकसान भरपाईच्या अभिहस्तांकित रकमा जमीन महसुलावरिल स्थानिक उपकर, वाढीव सापेक्ष उपकर अंतर्गत जिल्हा परिषदेकडून प्राप्त होणा-या गट अनुदानामधुन पंचायत समितीचे अधिकार क्षेत्रात घ्यावयाच्या योजनांचे अर्थसंकल्पीय अंदाज 15 फेब्रवारी पुर्वी पंचायत समितीचे मासिक सभेत मंजुर करुन जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ठ करण्याकरिता जिल्हा परिषदेस सादर करावयाचे आहेत.
3. लेखा विभाग संघटना कार्य आणि कर्तव्ये :-
पंचायत समिती लेखा विभागा अंतर्गत कार्यरत सहाय्यक लेखा अधिकारी / कर्मचारी यांनी लेखा विभागाची संपुर्ण कामे काटेकोरपणे शासन नियमानुसार करणे करीता गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी लेखा विषयक कामे सुरळीत व अचुकरित्या होत आहे किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे.
लेखा विभागा मधील शासकिय प्राधिकाऱ्यांच्या कर्तव्याबाबतच्या तरतुदीनुसार माहिती व अधिकारी / कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये-
1. सहाय्यक लेखा अधिकारी :-
कर्तव्ये:- लेखा शाखेचे प्रमुख म्हणून कार्य करणे, स्थानिक निधी लेखापरिक्षा व महालेखाकार यांचेकडून प्राप्त लेखा आक्षेपाचा निपटारा करणे, , पंचायतराज पुनर्विलोकन अहवाल अनुपालन जिल्हा परिषदेला सादर करणे, पंचायत समिती सेसफंडाचे अंदाजपत्रक तयार करणे व मंजुरीस सादर करणे, वित्तीय सल्लागार म्हणुन कार्य करणे, लेखा विषयक नोंदवहयाची पडताळणी करणे तसेच कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रोखपाल यांचेवर नियंत्रण ठेवणे.
2. कनिष्ठ लेखा अधिकारी :-
कर्तव्ये :- लेखा विभागात प्राप्त झालेल्या देयकाची तपासणी करुन गट विकास अधिकारी यांचेकडे मंजुरीस सादर करणे, जमा खर्च पंजी नोंदवहीची तपासणी करणे, मासिक तथा वार्षिक लेखा तयार करुन मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी,जि. प. गडचिरोली यांचेकडे सादर करणे, लेखा विषयक संपुर्ण नोंदवह्या अद्यावत ठेवणे, सामान्य रोख पुस्तकाशी बँकेच्या शिल्लकेची ताळमेळ करणे आणि रोखपालावर नियंत्रण ठेवणे.
3. वरिष्ठ सहाय्यक ( लेखा ) :-
कर्तव्ये :- लेखा विभागातील कार्यविवरण पंजी व नियत कालिके पंजी अद्यावत ठेवणे, लेखा विषयक संपुर्ण पत्र व्यवहार हाताळणे, सामान्य रोख पुस्तके हाताळणे, जमा खर्च पंजी आणि ईतर लेखा विषयक नोंदवह्या अद्यावत ठेवणे.
4. कनिष्ठ सहाय्यक (लेखा)/रोखपाल :-
कर्तव्ये :- पंचायत समिती रोख रक्कमेची अभिरक्षा करणे, किरकोळ रोख पुस्तक हाताळणे, शासकिय व जिल्हा परिषद चालान फाईल अद्यावत करणे, पोष्टाचे समयबध्द ठेवी, आवर्ती ठेवी यांचा संपुर्ण हिशोब ठेवणे व गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगीतलेली कामे हाताळणे.
लेखा विभागात रोखपाल, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) आणि कनिष्ठ लेखा अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली लेखा विषयक संपुर्ण कामे व नोंदवह्या यांची पडताळणी सहाय्यक लेखा अधिकारी यांचेकडून करुन गट विकास अधिकारी यांचेकडे प्रस्तावित करण्यात येतात.
4. पंचायत समिती लेखा विभाग संरचना:-
रचनात्मक तक्ता
कार्यालयाचे नांव :- पंचायत समिती, देसाईगंज
गट विकास अधिकारी

5. लेखा विभागात कार्यरत अधिकारी/ कर्मचारी माहिती :-
अ.क्रं. | अधिकारी/ कर्मचारी नांव | पदनाम |
1 | श्री नरेंद्र धर्माजी रामटेके | सहाय्यक लेखा अधिकारी |
2 | श्री दिपक यशवंत चिखराम | कनिष्ठ लेखा अधिकारी (प्र.) |
3 | श्री दिपक यशवंत चिखराम | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) |
4 | श्री अनिल भगवान किन्नाके | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) |