पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

शिक्षण विभाग पंचायत समिती देसाईगंज

पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत  अत्यंत महत्वपूर्ण विभाग म्हणजे शिक्षण विभाग होय. शिक्षण विभागांतर्गत  इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नरत असते. याशिवाय विविध प्रकारच्या शिष्यवृत्यांचे लाभ मिळवून देण्यासाठी नियमीत पाठपुरावा करण्यात येते. सोबत प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती योजना अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकत असणा-या शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा व अंशत अनुदानित शाळामधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन व पूरक आहार योजनेचा लाभ दिला जातो.        

              तालुक्यात  एकूण शाळा संख्या 88 असून  जिल्हा परिषद व्यवस्थापन- 35, नगर परिषद व्यवस्थापन-08, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा-35 व स्वंय अर्थसहायीत शाळा-10 चा समावेश आहे.

शासकीय शैक्षणिक योजना राबवविणे

ऑनलाईन MAHADBT Portal शिष्यवृत्ती

01.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती-इयत्ता 5 ते 7वी व 8 वी ते10वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुली
02. माध्य.शाळा गुणवत्ता शिष्यवृत्ती – 5 वी ते 7 वी SC/ST/VJNT/SBC, 8 वी ते 10 वी SC/ST/VJNT/SBC
03.परीक्षा फी प्रदाने इयत्ता 10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना – SC/ST/VJNT/SBC
04.भारत सरकार मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती – इतर मागास प्रवर्गातील गरीब कुटुंबातील इयता 1 ली ते 10 वी चे विद्यार्थी
05.अस्वच्ठ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती –
06.9वी व 10 वी शिकणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना-
07.इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणा-या DNTप्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना-
08.दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती – 1ली ते 4 थी,5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 वी.
09.प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना – स्थानिक स्वराज्य संस्था,नगर परिषद व खाजगी अनुदानित शाळा मध्ये शिकत असलेली इयत्ता 1 ली ते 8 वी चे सर्व विद्यार्थी.

ऑफलाईन शिष्यवृत्ती

  • सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती प्रस्ताव, अनु.जाती प्रवर्गातील मुले व मुलींसाठी
    इयत्ता 1 ली ते 4 थी – 1000/- रुपये
    इयत्ता 5 वी ते 7 वी – 1500/- रुपये
    इयत्ता 8 वी ते 10 वी – 2000/- रुपये >
  • मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गटातून जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा विसोरा यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा-परिषद-प्राथमिक-कन्या-शाळा-विसोरा

समग्र शिक्षा,गट साधन केंद्र देसाईगंज

समग्र शिक्षा,गट साधन केंद्र देसाईगंज हे शिक्षण विभाग,पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत   पायाभूत सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण योजनेची अंमलबजावणी करीत असलेला  कार्यालय आहे. याचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी हे असतात, या कार्यालयात गटसमन्वयक हे या कार्यालयामार्फत राबविल्या जाणा-या सर्व योजनांचे प्रमुख म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. तसेच प्रती केंद्र 01 केंद्रप्रमुख याप्रमाणे  शालेय कामकाजाचे प्रशासकीय व गुणवत्ता संनियंत्रणाचे कार्य  पार पाडतात. या कार्यालयात एक वरिष्ठ लेखा लिपीक-सर्व योजनाचे आर्थिक बाबींचे कामकाज पाहतात, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर-युडायस प्लस व इतर सर्व कामकाज पाहतात. विषय साधन व्यक्ती 06 पदे कार्यरत असुन शासनाच्या विविध उपक्रमाची अंमलबजावणी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  शाळाभेटी, विविध प्रशिक्षणे व योजनांची अंमलबजावणीचे कामे पाहत असतात. त्याचप्रमाणे समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत् 02 विशेष तज्ज्ञ व 05 दिव्यांग प्रकारानुसार संसाधन शिक्षक संबधीत विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन व समुपदेशन चे काम केले जाते.

राबविण्यात येणारे योजना व उपक्रम

01.मेाफत पाठयपुस्तक योजना- शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी, इ.1 ली ते 8 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी.
02. मेाफत गणवेश योजना – स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषद शाळांमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी, इ.1 ली ते 8 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी
03. आरटीई 25 टक्के मोफत प्रवेश योजना -स्वंयअर्थसहायीत शाळा,विना अनुदानित शाळा, विद्यार्थी आर्थिक व सामाजिक दृष्टया मागास व दुर्बल घटकांतील बालके यांना इयत्ता पहिली करिता प्रवेश दिला जातो.
04. दिव्यांग विद्यार्थ्यांना वय वर्षे 0 ते 18 वयोगटातील सर्व आवश्यक सोयी सुविधा ,साहित्य सुविधा,विशेष शिक्षक मार्गदर्शन,पालक समुपदेशन,समाजकल्याण दिव्यांग शिष्यवृत्ती योजना.दिव्यांगत्व प्रमाणपत्र सुविधा,लार्ज प्रीट वाचन साहित्य,अस्थिव्यंग विद्यार्थी शस्त्रक्रिया,समाजकल्याण दिव्यांग शिष्यवृत्ती योजना – दिव्यांगत्व असलेले सर्व विद्यार्थी
05. मदतनीस भत्ता- बहुविकलांग विदयार्थी स्वता शाळेत येउ शकत नाही त्यांना 600/-रुपये प्रतिमाह 10 महिने करिता
06. प्रवास भत्ता-5 कि.मी,अंतराबाहेरील विउयार्थ्यांना जानेयेनेचा ख्सर्च, 600/-रुपये प्रतिमाह 10 महिने करिता
07. विद्यावेतन भत्ता-100 % उपस्थिती असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना, 200/-रुपये प्रतिमाह 10 महिने करिता
08. वाचक भत्ता – दृष्टीदोष असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना, 200/-रुपये प्रतिमाह 10 महिने करिता
09.शाळांचे यु-डायस प्लस,सरल पोर्टल – मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा.
10.संयुक्त शाळा अनुदान – स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषद व्यवस्थापन शाळा.
11.शाळा बाहय विद्यार्थी शोध मोहिम सर्वेक्षण – सर्व शाळा व गावे

गटशिक्षणाधिकारी
error: Content is protected !!
Scroll to Top