पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, देसाईगंज जिल्हा परिषद, गडचिरोली

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत देसाईगंज तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण क्षेत्रामध्ये (सर्व ग्राम पंचायती व वाड्यांमध्ये) नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि जल जीवन मिशन सारखे कार्यक्रम राबवून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम सुकर होण्याकरिता देसाईगंज तालुका येथे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाची स्थापना करण्यात आली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांचे कार्य व उद्देश:

  • देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागामधील सर्व कुटुंबांनाहर घर जल या मिशन अंतर्गत नळ जोडणीद्वारे शुद्ध आणि आवश्यक (दरडोई किमान ५५ लिटर) तेवढे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
  • उन्हाळ्यामध्ये देसाईगंज तालुक्यामध्ये निर्माण होणाऱ्या कृत्रिम पाणी टंचाई च्या निवारणार्थ विविध उपाययोजना करणे व लोकांना किमान पाणीपुरवठा होईल असे प्रयत्न करणे.
  • पाणीपुरवठा योजनांचा विद्यूत भार कमी करून शाश्वत उर्जेवर आधारित योजना जसे कि सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना राबविणे.

योजना:

केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवून ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणे.

  • जल जीवन मिशन (हर घर जल) जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्टे आहेत.

  • सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना ग्रामीण भागामध्ये विद्युत नियमिततेची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असून वीज बिल भरणा करणेसंबंधी अडचणी येतात. तसेच आजच्या काळाच्या गरजेनुसार विद्यूत उर्जेचा भार कमी करून शाश्वत उर्जा स्त्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना अंमलात आणून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर आहे.

  • प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देसाईगंज तालुक्यांतर्गत मौजा डोंगरगाव येथील गाढवी नदीवर आधारित पोटगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. त्या अंतर्गत ४ ग्राम पंचायती व ७ गावांचा समावेश आहे.

अ.क्र.

योजनेचे नाव

ग्रामपंचायत

गावांचे नाव

पोटगाव

पोटगाव

डोंगरगाव (ह)

डोंगरगाव (ह)

चिखली रिठ

पोटगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना

चिखली तुकूम

अरततोंडी

विहीरगाव

विहीरगाव

पळसगाव

पळसगाव

प्रशासकीय रचना :

  • उपविभागिय अभियंता
  • शाखा अभियंता /कनिष्ठ अभियंता
  • वरिष्ठ सहायक
  • कनिष्ठ सहायक

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग देसाईगंज कार्यालयातील

अ.क्र.

अधिकारी/कर्मचारी यांचे नाव

पद

मोबाईल नंबर

1

श्री आशिष सुंदरलाल कटरे

उपविभागीय अभियंता

९५६१५६५६११

2

कु. प्रतिमा तेजराम राखडे

कनिष्ठ अभियंता

९१३०४४०१९९

कु. श्वेता वासुदेव सिडाम

कनिष्ठ अभियंता

८२०८९६२५७२

4

सौ. पोर्णिमा रामहरी दिघोरे

कनिष्ठ सहाय्यक

८४१२८६८०५२

5

सौ. स्वाती बारसागडे

डेटा एन्ट्री ऑपरेटर

७४९९०८५६०३

5

श्री. राजू सिद्दमवार

परिचर

९०२१५९९३९२

6

सौ.नलिनी सहारे

परिचर

९५७९७२११६७

error: Content is protected !!
Scroll to Top